PF खातेदारांसाठी आनंदाची बातमी. पीएफचे पैसे काढणे आणि ट्रान्सफर करणे झाले सोप्पे, जाणून घ्या सर्व माहिती.epfo Date of exit rule

Created by shiva 18 February 2025

epfo Date of exit rule:-नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO त्याच्या पोर्टलमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो PF खातेधारकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली व त्यानंतर पैसे काढायचे तर तो ‘डेट ऑफ एक्झिट’ (डीओई) स्वतः अपडेट करू शकणार आहे. ही माहिती कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.Date of exit rule

नोकरी सोडल्यानंतर ‘डेट ऑफ एक्झिट’ अश्या प्रकारे अपडेट करा

‘डेट ऑफ एक्झिट’ अपडेट करण्यासाठी, सुरुवातीला तुम्हाला ईपीएफओच्या मुख्य वेबसाइटवर जावे लागणार आहे.त्यानंतर, युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागणार आहे.महत्तवाचे म्हणजे तुमचा UAN नंबर ऍक्टिव्ह असावा हे लक्षात ठेवा.uan active 

यानंतर, पोर्टलवरील ‘मॅनेज’ या पर्यायावर वर जा आणि ‘एक्झिट मार्क’ पर्यायावर क्लिक करा.ड्रॉपडाउन मेनू मध्ये तुमच्या जुन्या कंपनीचा पीएफ खाते क्रमांक निवडा.येथे तुम्हाला नोकरी सोडण्याची तारीख आणि कारण भरण्याचा पर्याय दिसून येईल.uan update 

कारण म्हणून सेवानिवृत्ती किंवा अल्प सेवा यासारखे पर्याय दिले जातील.यानंतर, ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा आणि लगेच ओटीपी तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.Epfo Uan Update Rule

ओटीपी टाकल्यानंतर ‘ओके’ वर क्लिक करा.या प्रक्रियेनंतर तुम्हाला एक मेसेज मिळेल की तुमच्या PF खात्यामध्ये तुमची ‘बाहेर पडण्याची तारीख’ यशस्वीरित्या अपडेट झाली आहे.हा मेसेज म्हणजे तुमचा pf लॉगऑऊट प्रक्रिया पूर्ण झाली आहे.epfo hike 

Epfo ने केलेल्या या बदलावाचा परिणाम

जर तुम्ही तुमची नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळवणार असाल तर तुम्हाला पहिल्या कंपनीकडून डेट ऑफ एक्सिट हे करण्याची वाट पहावी लागणार नाही.या सुविधेमुळे तुम्हाला लवकरात लवकर पैसे काढता येणार आहेत.हा सुधार पीएफ प्रक्रिया तर सोप्पी करेलच पण टॅक्स अडचणी पासून ही वाचवणार आहे.epfo new rule 

Leave a Comment

You cannot copy content of this page